दिल्ली, दि. २६ :- मिळालेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आज दिनांक २६/१२/२०२४ रोजी निधन झाले. याअगोदर 2006 मध्ये मनमोहन सिंग यांच्यावर दुसऱ्यांदा बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने तत्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते 92 वर्षांचे होते.
त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी गाह, पश्चिम पंजाब (आता पाकिस्तानमध्ये) येथे झाला.
2004 ते 2014 या काळात ते दोनदा देशाचे पंतप्रधान होते आणि भारतातील महान अर्थतज्ज्ञांमध्ये त्यांची गणना होते. त्यांचे शिक्षण चंदीगड येथील पंजाब विद्यापीठ आणि ग्रेट ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात झाले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.
मनमोहन सिंग त्यांच्या साध्या आणि शांत स्वभावासाठी कायम स्मरणात राहतील.