मुंबई, दि. २९ : विधिमंडळाच्या महत्त्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवळ करतांना नाना पटोले, नितीन राऊत, विश्वजित कदम यांच्यापैकी एकाला लोकलेखा समितीचे अध्यक्षपद दिले जाईल, अशी चर्चा होती मात्र अंतिमतः काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आता लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून विजय वडेट्टीवार हे राज्य सरकारच्या विविध खात्यांचे अंकेक्षण महालेखाकार सांभाळणार आहेत. त्याचा अहवाल विधिमंडळात सादर केला जातो. या अहवालाची छाननी करणे, आणि अहवालातील अनियमिततांवर बोट ठेवत सरकारकडे शिफारशी करणे असे लोकलेखा समितीचे काम असते.
००००