Homeमहाराष्ट्रराज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी १०० दिवसांच्या आराखड्यातून लोककेंद्रित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार का...

राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी १०० दिवसांच्या आराखड्यातून लोककेंद्रित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार का ?

@ वने, कृषि, उच्च व तंत्र शिक्षण विभागांना आराखड्या तयार करण्याच्या सूचना


मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील १०० दिवसांचा आराखडा वन, कृषि, उच्च व तंत्र शिक्षण विभाग तयार करीत आहेत. या आराखड्यात लोककेंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना तसेच राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असणार आहे

वन विभागाने महाराष्ट्रातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता वन्य प्राणी व मानव यामधील संघर्ष कमी करण्यासाठी बिबटे निवारा केंद्रांची क्षमता वाढविण्याबबरोबर. कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगातून मानव व वन्य प्राणी संघर्षामध्ये गतीने मदत मिळण्यासाठी बचाव दलाची स्थापना करण्याची देखील आवश्यकता आहे. या दलातील मनुष्यबळाला उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन वृक्षलागवडीचा संस्कार रूजण्यासाठी असे अभिनव उपक्रम कायमस्वरूपी अंमलात आणण्याची गरज आहे. तसेच शहरी भागातील वनीकरण वाढविण्यासाठी मियावाकी वृक्षलागवड पद्धत शहरांमध्ये उपयोगात आणावी.

कृषि विभागाने कार्बन क्रेडीट कंपनी स्थापन करण्याबाबत धोरण तयार करून आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवत योजनांची अंमलबजावणी करावी. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने देशात येणाऱ्या परदेशी विद्यापीठांना आकर्षित करून शैक्षणिक संकुल निर्माण करण्याची गरज आहे

सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण, वन व कृषि विभागाच्या आयोजित बैठकीत वरील विषयांना केंद्रबिंदूत ठेऊन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला. आणि नवीन १०० दिवसांच्या आराखड्यातून वन, कृषि, उच्च व तंत्र शिक्षण विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments