इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. २१ :– परभणी मधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असून संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल,
तसेच घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा परभणी येथील प्रकरणासंदर्भात विधानसभेत काल झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली.

परभणी जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारताच्या संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. त्यामुळे हा अपमान सहन केला जाणार नाही. परभणी येथील कृत्य एका मनोरूग्णाने केले आहे. तो मनोरुग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवालही उपलब्ध आहे.

त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. या प्रकरणात कोंबिंग ऑपरेशन झाले नाही. परंतु पोलीसांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला आहे काय याची चौकशी केली जाईल. ही चौकशी पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून करण्यात येईल. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
