HomeBreaking Newsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अपमान केल्याप्रकरणी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अपमान केल्याप्रकरणी भीम आर्मी तर्फे तीव्र निषेद आंदोलन

@ अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी - मा. प्रमोद कातकर (जिल्हा उपाध्यक्ष, भीम आर्मी चंद्रपूर) यांनी केली

कोठारी, दिनांक २० :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्याद्वारे लिखित भारतीय संविधान हे केवळ एका विशिष्ट जातीधर्मासाठी नसून ते या देशातील सर्व भारतीयांसाठी आहे. बाबासाहेबांच्या लिखित भारतीय संविधानामुळेच हा देश एकसंघ आहे. सर्व जातीजमातीचे / धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहे. असे असतानादेखील देशातील गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बी. आर. आंबेडकरांबद्धल संसदेत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी भीम आर्मी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मा. सुरेंद्र रायपुरे यांच्या आदेशान्वये जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कातकर यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालय कोठारी (संविधान चौक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतड्या समोर घटनेबाबत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्य संसदेत विशेष चर्चेदरम्यान अमित शहा यांनी “आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, बोलना अभी एक फॅशन हो गया है. “इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मो तक स्वर्ग मिल जाता असे बेताल वक्त्यव्य त्यांनी राज्यसभेतील भाषणात केले. याचाच उद्रेक संसदेपासून तर तमाम आंबेडकरप्रेमी यांनी रस्त्यांवर येऊन निषेध नोंदविला आणि अमित शहा यांना त्यांच्या मंत्रिमंडळातून बर्खास्थ करून राजीनामा द्यावा व संपूर्ण देशाची माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आजच्या तीव्र निषेध आंदोलनात कोठारी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच अमोल कातकर, जामा मस्जिद मुस्लिम कमेटी सचिव रियाज शेख, काँग्रेस चे युवा नेते अखिल गेडाम, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष लखन उराडे, भीम आर्मी शाखा कोठारी चे कार्याध्यक्ष युगल तोडे, कार्यकर्ते पंकज जावलीकर, विनोद कुळसंगे, निखिल मावलीकर, अमित चंदावार, सागर मुरमाळकर, आकाश कांबळे, प्रफुल साखरकर, शुभम खोब्रागडे, अजय खोब्रागडे, आशिष पाटील, राहुल देठे, नितीन बोरकर, सुरज खोब्रागडे, राहुल वासंमवार, जेष्ठ कार्यकर्ते बाळू खोब्रागडे, रवी गोंधळी, मधुकर शेरकर, मनोरमा रंगारी तसेच बहुसंख्याने भीमसैनिक सहभागी होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments