Homeचंद्रपूरFarmer News : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाला यश

Farmer News : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाला यश

@ धान नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ @ नोंदणी पासून वंचित शेतकऱ्यांना फायदा

Success in the efforts of A. Sudhir Mungantiwar

इंडियन दस्तक न्यूज

चंद्रपूर, दि. ०३ – शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

खरीप पणन हंगाम 2024-2025 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरीता दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत होती मात्र शेतकऱ्यांची यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकरी तसेच अभिकर्ता संस्थांनी मुदतवाढीची मागणी आ. मुनगंटीवार यांच्याकडे केली होती.

आ. मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत धान खरेदीची ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदत वाढविण्यासाठी, अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव व मंत्री यांच्यासोबत मुदत वाढवून देण्यासंदर्भात चर्चा करून हा विषय अत्यंत तातडीचा असल्याची बाब लक्षात आणून दिली होती. यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता.

अखेर आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला प्रतिसाद देत अन्न, नागरी पुरवठा विभागाने नोंदणीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना धानाची ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शेतकऱ्यांप्रती संवेदनशील
आ. श्री. मुनगंटीवार पालकमंत्री असताना त्यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटींची रक्कम मिळू शकली. शेतकऱ्याच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन धान उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सदैव शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments