Homeबल्लारपूरबल्लारपूर पब्लिक स्कूल, येनबोडी ला विदर्भ विज्ञान प्रदर्शनात द्वितीय पुरस्कार

बल्लारपूर पब्लिक स्कूल, येनबोडी ला विदर्भ विज्ञान प्रदर्शनात द्वितीय पुरस्कार

Ballarpur Public School, Yenbodi wins second prize in Vidarbha Science Exhibition

कोठारी, दि. २९ :- गुरुनानक पब्लिक स्कूल, बल्लारपूर च्या वतीने विदर्भ स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या प्रदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास २० शाळांनी सहभाग घेतला होता. बल्लारपूर पब्लिक स्कूल, येनबोडी तर्फे वर्ग आठवीतील विद्यार्थिनी कुमारी क्रिशिका धनराज हिवरे आणि हर्षाली विनोद उरकुडे यांनी या प्रदर्शनात भाग घेतला होता.

त्यांनी ड्रेन वॉटर रिक्लेमेशन टू ऑरगॅनिक फार्मिंग (जैविक शेतीसाठी नालीच्या अशुद्ध पाण्याचा वापर) याविषयावर आधारित प्रकल्प सादर केला. त्याच प्रकल्पावर बल्लारपूर पब्लिक स्कूल, येनबोडीने द्वितीय पुरस्कार पटकाविला आहे. यासाठी त्यांना विज्ञान शिक्षक महेश देवईकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

विज्ञान प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागत आहे. यातून नव्या नव्या संकल्पना विद्यार्थी प्रत्यक्षात साकारत आहे.विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या लहान मोठ्या प्रयोगातून मोठे संशोधन पुढे येऊ शकते.आजचे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक आहे. विज्ञान प्रदर्शनी हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे एक व्यासपीठ आहे.

शाळेचे संचालक श्री संजय वासाडे सर, व्यवस्थापिका प्रोफेसर मेघा शुक्ला मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना बाबुलकर मॅडम यांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले आणि दि. ३ व ४ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथे होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनी सहभागी होण्याकरिता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments