Homeदेश / विदेशकोठारी येथील अर्धवट रखडलेल्या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे मंत्री...

कोठारी येथील अर्धवट रखडलेल्या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे मंत्री नितीन गडकरी कळून आश्वासन

@ आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मंत्री नितीन गडकरी सोबत वार्तालाप @ डांबरी रस्त्याचे रूंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करण्याची विनंती

संदीप मावलीकर (संपादक / इंडियन दस्तक न्यूज)

पत्रकार / नवी दिल्ली, दि. ०८ : नुकतेच नवी दिल्ली येथे मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग विकास मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते आणि पूल संदर्भात चर्चा केली.

सतत चे होत असणारे अपघात टाळण्यासाठी आक्सापूर ते बामणी मार्गावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच कोठारी येथील अर्धवट रखडलेल्या पुलाचे काम पूर्ण करण्याचे तसेच रस्त्याचे दुरुस्ती करण्याचे काम तात्काळ करावे. आणि लावारी – कळमना मार्गावरून बांबू डेपोपर्यंत रस्त्याचे रूंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करावे, अशी नागरिकांची गरजही यावेळी निवेदनाद्वारे मांडली.

सोबत मूल ते चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या खराब स्थितीची माहिती देत, त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची विनंती केली. तसेच चंद्रपूर- मुल राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रिट करण्यासाठी निवेदन दिले.

तसेच मुल शहरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी बायपास रोड करण्यात यावे. आणि मूल ते चंद्रपूर महामार्गावरील सुमारे ३० वर्षांपासून जुन्या पुलाला पडलेले मोठमोठे खड्डे तात्काळ सिमेंट काँक्रिटने भरावेत, ही मागणी केली.

या सर्व विषयांवर मा. गडकरीजींनी सहानुभूतीपूर्वक विचार करत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासनही दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments