Homeचंद्रपूरसावधान : चंद्रपूर जिल्हात बर्ड फ्लू चा शिरकाव ?

सावधान : चंद्रपूर जिल्हात बर्ड फ्लू चा शिरकाव ?

@ मांगली गावाच्या 10 कि.मी. परिसरातील क्षेत्र ‘अलर्ट झोन’ म्हणून घोषित. @ बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश. @ प्रभावित साडेचारशे कोंबळ्या नष्ठ करण्यात आल्या आहे.

प्रतिनिधी / चंद्रपूर, दि. 0६ : ब्रम्हपूरी तालुक्यातील मौजा मांगली येथील कुक्कुट पक्ष्यांमध्ये 25 जानेवारी 2025 पासून मरतुक दिसून आल्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुक्कुट पक्ष्यांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे व भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद – राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळेत सादर करण्यात आले होते.

पाठवलेल्या नमुन्याचा वैधकीय अहवाल प्राप्त दि.०४ रोजी बर्ड फ्लू (AVIAN INFLUENZA H५N१) पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांनी या आजाराचा प्रसार होऊ नये, याकरिता तत्काळ मांगली गावाच्या 10 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र ‘सतर्कभाग’ (Alert Zone) म्हणून घोषित केला गेल्या.

बाधित क्षेत्रात मांगली, गेवर्लाचक व जुनोनाटोली येथील कुक्कुट पक्षी जलद प्रतिसाद दलामार्फत प्राप्त माहितीनुसार शास्त्रोक्त पदध्दतीने संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रभावित साडेचारशे कोंबळ्या नष्ठ करण्यात आल्या आहे.

बाधित क्षेत्रातील उर्वरित पशुखाद्य, अंडी, इत्यादीचे शास्त्रोक्त पध्दतीने नष्ट करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे. प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये- जा करण्यास मनाई करण्यात आली असून त्या ठिकाणची खाजगी वाहने प्रभावीत परिसराच्या बाहेर लावण्याबाबत आदेशित केले आहे.

तसेच प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे इत्यादिच्या वाहतूकीस मनाई करण्यात आली आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस, तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे.

प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर 2 टक्के सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभावित क्षेत्राच्या 5 कि.मी. त्रिज्येतील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने व कुक्कुट मांसाची (चिकन) दुकाने, वाहतूक, बाजार व यात्रा / प्रदर्शन, इत्यादी बाबी बंद करण्यात आले.

नागरिकांना आवाहन : ७० डिग्री. से. पर्यंत उकडलेली अंडी व शिजविलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे बर्ड फ्लू रोगाबाबत नागरिकांनी अनावश्यक भीती बाळगू नये. तसेच अफवा व गैरसमज पसरवू नये. तसेच जिल्ह्यात कोठेही पक्ष्यांमध्ये असाधारण मरतुक आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये किंवा 1962 या टोल फ्री दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे यांनी केले आहे.
००००००

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments