इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क
Supply of mini tractors and accessories to self-help groups of Scheduled Castes and Neo-Buddhist communities

प्रतिनिधी / चंद्रपूर, दि. 04 : अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटाना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणे या योजनेत अमुलाग्र बदल करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटाला देण्यात येणारे (अर्थसहाय्य) हे वस्तू स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्य हे रक्कम रु. 3.15 लाख रुपये बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

योजनेच्या अर्टी व शर्ती :
स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावे. बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य तसेच बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न असावे.

स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारचे Ministry of agriculture, & farmers Welfare Department of agriculture, Co-Operation and farmers Welfare यांनी निर्धारित केल्यानुसार फार्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इन्स्टीट्युट यांनी टेस्ट करुन जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावेत.

पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांना शासनाने त्या-त्या जिल्ह्यासाठी निश्चित करुन दिलेल्या उदिष्टांनुसार अर्थसहाय्य मंजुर करुन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचत गटाला त्यांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर उपसाधने अर्थसहाय्य घेतल्यानंतर सदर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाथने विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. तशा आशयाचे हमीपत्र स्वयंसहाय्यता बचत गटाला द्यावे लागेल. तसेच प्रत्येक वर्षी 10 वर्षापर्यंत त्याबाबत प्रमाणपत्रास मंजूरी देणाच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक असेल. ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी पॉवर ट्रिलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहे, त्या बचत गटांना यायोजनेचा लाभ घेता येणार नाही.

पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुध डेअरी रोड, जल नगर वार्ड, चंद्रपूर येथे संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
००००००
