संदीप मावलिकर (संपादक / इंडियन दस्तक न्यूज)
पत्रकार / चंद्रपूर, दि. १६ : चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारीला गती दिली आहे. याच अनुषंगाने नुकतेच चंद्रपूर येथील विश्रामगृह येथे आघाडीच्या प्रमुख नेत्यांची खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक स्थानिक पातळीवर मित्र पक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. व याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच, महानगरपालिकेवर विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी केला.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा डॉ दिलीप चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, काँग्रेसचे विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर, उबाठा शहर अध्यक्ष सुरेश पचारे, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य,

संभाजी ब्रिगेड मार्गदर्शक दीपक जेऊरकर,उबाठा गटाचे नेते सतीश भिवगडे, उबाठा उपाध्यक्ष शालिक फाले, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, मनपा माजी स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, मनपा माजी स्थायी समिती सभापती नंदू नगरकर, माजी नगरसेवक राजेश अडूर, काँग्रेस नेते शिव राव, उबाठा नेते अजय वैरागडे, माजी शहर प्रमुख उबाठा प्रमोद पाटील, नवशाद शेख, पप्पू सिद्धीकी आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
