Homeपोम्भूर्णाअंधश्रद्धेतून वन्यप्राण्यांची शिकार विकृत मानसिकतेचे लक्षण- राजेंद्र घोरुडे

अंधश्रद्धेतून वन्यप्राण्यांची शिकार विकृत मानसिकतेचे लक्षण- राजेंद्र घोरुडे

सुरेश रंगारी (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)

पत्रकार / कोठारी, दि. ०८ : आजही अंधश्रध्दा मानून वन्यप्राण्यांची शिकार केली जाते, पैश्याच्या लोभात शिकारी करणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे, असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे यांनी केले.

वन्यजीव सप्ताह अंतर्गत बल्हारपूर वनपरिक्षेत्र मधील उमरी पोतदार येथे अंधश्रध्दा आणि वन्यजीव शिकार याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच थामेश्वरी लेंनगुरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक सुशील गव्हारे, शिक्षक अरुण कोवे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे राजेश्वर परचाके, रत्नाकर देवईकर उपस्थित होते.

यावेळी संतोष कुंदोजवार यांनी वने वन्यजीव आणि मानव संघर्ष तसेच अंधश्रद्धेतून वन्यप्राण्यांची शिकार याबाबत विविध प्रयोग व उदाहरण देऊन प्रबोधन केले.

कार्यक्रमात क्षेत्र सहायक देवराव टेकाम, कमलेश पोडचेलवार, अब्बास पठाण, वनपरिक्षेत्रतील सर्व वनरक्षक, वनमजूर, पी आर टी पथक, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

संचालन वनरक्षक प्रियंका अंगलवार यांनी केले प्रास्ताविक वनरक्षक धर्मेंद्र मेश्राम यांनी केले तर वनरक्षक शीतल कुलमेथे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments