पत्रकार/कोठारी :-Agri Stack Yojana : बल्लारपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या कोठारी गावामध्ये दि. २९ जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेची माहिती सर्वसामान्य गावखेड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शाहू-फुले-आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, कोठारी येथे एक दिवशीय शिबिराचे आयोजन प्रशासनामार्फत करण्यात आले होते.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ हि योजना दिनांक १६ डिसेम्बर २०२४ पासून महाराष्ट्रामध्ये सुरु झाली असून यामध्ये ७/१२ मध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्यांना सदर योजनेमध्ये नोंदणी करता येते. सर्वत्र नोंदणी हि निशुल्क असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावे असे आव्हाहन बल्लारपूर तहसील चे नायब तहसीलदार मा. साळवे साहेब यांनी केले.

‘ॲग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःची ओळख म्हणून फार्मर आयडी प्राप्त होणार आहे. सोबत पीक कर्ज, पीएम किसान योजना आणि पीक विमा सह सर्व सहकारी योजनांचा आणि महा-डीबीटी पोर्टलवरील योजनांचा अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने लाभ मिळणार आहे.
आजच्या ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेबाबतच्या शिबिरामध्ये मार्गदर्शक म्हणून मा. साळवे साहेब नायब तहसीलदार, बल्लारपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सोबत कोठारी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अजय धवणे, काटवली ग्रा. पं. चे सरपंच राजेश ढुमणे, कोठारी ग्रा. पं. उपसरपंच सुनील फरकडे, सदस्य चंद्रकांत राजूरकर, रतन वासनिक तसेच कृषी व महसूल विभागासंबंधी अधिकारी देखील उपस्थित होते.
सदर च्या एक दिवशीय कॅम्प मध्ये उपस्थित शेतकऱ्यांची ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत निशुल्क नोंदणी करून देण्यात आली.

‘ॲग्रीस्टॅक’ योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
१) आधार कार्ड ( मोबाईल लिंक असणे आवश्यक)
२) ७/१२
३) आधारला लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक
४) आधार कार्ड ला मोबाईल लिंक नसल्यास वेक्तीशा हजर राहणे आवश्यक
नोट :- ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेची नोंदणी ग्रामपंचायत व CSC केंद्रांवर निशुल्क आहे.