Homeबल्लारपूरकोठारीकोठारी येथे दुर्गा विसर्जन शांततेत संपन्न

कोठारी येथे दुर्गा विसर्जन शांततेत संपन्न

@ ग्रामस्थ व पोलिसांचे उत्तम सहकार्य

सुरेश रंगारी (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)

पत्रकार / कोठारी, दि. ०८ : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडली. दुपारी दोन वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री दहा वाजेपर्यंत चालली. गावातील बारा मंडळांनी सहभाग घेतलेली ही मिरवणूक ढोल-ताशा आणि डीजेच्या गजरात पार पडली.

गावकऱ्यांचा शिस्तबद्ध सहभाग, तसेच पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू न देता मिरवणूक सुरळीत पार पडली. पोलिसांनी मिरवणूक मार्गावर आवश्यक ती गर्दी नियंत्रण व्यवस्था केली होती. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सोयी करण्यात आल्या होत्या.

संपूर्ण गाव एकत्र येत, देवींचे गावातील तलावात सर्व प्रकारची विसर्जन व्यवस्था पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करत, पारंपरिक व आधुनिक वाद्यांच्या गजरात श्रद्धा व भक्तीमय वातावरणात मिरवणूक पार पाडली. कोणताही अनुशासनभंग न होता मिरवणूक निर्विघ्नरीत्या पार पडल्याबद्दल ग्रामस्थ व पोलीस प्रशासनातील कोठारीचा सहा.पोलीस निरीक्षक ठाणेदार योगेश खरसान,इंगळे,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश तपासे,व्यापारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या मिरवणुकीत मनसे कार्यकर्ता शंकर भटारकर यांनी साईबाबा देवस्थान समोर गावकरी व मंडळाच्या सभासदांना मसाला भात व पाण्याची व्यवस्था केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments