HomeBreaking Newsडॉ. चंद्रहास्य नंदनवार यांना जगातील अव्वल 2% शास्त्रज्ञांच्या यादीत मान्यता

डॉ. चंद्रहास्य नंदनवार यांना जगातील अव्वल 2% शास्त्रज्ञांच्या यादीत मान्यता

पत्रकार / गडचिरोली, दि. २९ : येथील गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतून नुकतीच आचार्य पदवी प्राप्त गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संशोधक डॉ. चंद्रहास्य नंदनवार यांना “वर्ल्डस् टॉप 2% सायंटिस्टस् लिस्ट–2025” मध्ये स्थान मिळाले आहे.

सदरची यादी स्टॅनफोर्ड विद्यापीठाने तयार करून Elsevier यांनी प्रकाशित केली असून. ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स अँड फोटॉनिक्स या अत्याधुनिक प्रकाश-तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान गौरवण्यात आले आहे.संशोधकांची निवड करताना एकूण संदर्भ (citations), h-index, co-authorship adjusted hm-index, आणि c-score अशा मानकीकृत मापन निकषांचा वापर करण्यात आला असून त्यामुळे या निवडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा दर्जा प्राप्त झाला आहे.

या यादीत समाविष्ट झालेल्या मान्यवर संशोधकांमध्ये डॉ. चंद्रहास्य नंदनवार (भौतिकशास्त्र) यांचा समावेश आहे. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक योगदानाचे द्योतक नसून संस्थेच्या राष्ट्रीय (NIRF) तसेच आंतरराष्ट्रीय संशोधन प्रगतीतील वाढत्या प्रतिमेचे प्रतीक आहे.

वर्ल्डस् टॉप 2% सायंटिस्टस् लिस्ट प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी आपले श्रेय आपले आई-वडिल, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आणि गुरुजनांना दिले.वर्ल्डस् टॉप 2% सायंटिस्टस् लिस्ट मध्ये नाव आल्यामुळे डॉ. चंद्रहास्य नंदनवार यांचे परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments