Homeमूलमुल येथील रेल्वे उड्डाणपुलास ३१ कोटींची मंजुरी

मुल येथील रेल्वे उड्डाणपुलास ३१ कोटींची मंजुरी

@ आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

संदीप मावलिकर (संपादक / इंडियन दस्तक न्यूज)

पत्रकार / चंद्रपूर, दि. १२ : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, मुल शहरालगतच्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास पहिल्या टप्प्यात ३१ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

या ठिकाणी अवजड वाहने आणि इतर वाहतुकीमुळे वारंवार अडथळे निर्माण होत होते. नागरिकांनी यासंदर्भात आ.मुनगंटीवार यांना अवगत केले. या मागणीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

मुल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग एनएच ९३० वरील रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. GCF १२३ येथे उड्डाणपुलाच्या मंजुरीबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) दीपक कुमार गुप्ता यांनी याबाबत अधिकृत पत्राद्वारे आमदार श्री.मुनगंटीवार यांना मंजुरीची माहिती दिली आहे.

आपल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार मुनगंटीवार म्हणाले,विधानसभा निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचा मनस्वी आनंद आहे. हा उड्डाणपूल केवळ वाहतुकीचा प्रश्न सोडवणार नाही, तर मुल शहर आणि परिसराच्या सौंदर्यातही भर घालणार आहे. या पुलामुळे शेती, व्यापार आणि उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल.”
००००

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments