अमरावती, दिनांक 17 : आपला देश कृषिप्रधान असल्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्याशी प्रत्येकजण जुळलेला आहे. शेतीमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे वातावरण बदलाच्या संकटाला सामोरे जावे लागते. अशावेळी पूरक व्यवसाय मदतनीस ठरतात. बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकरी अस्थिर असतो. यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेती उद्योगधंद्यांचे नियोजन करण्यात येईल. अशी घोषणा अमरावती सायंन्सस्कोर मैदान येथे दि. १५ फेब्रु. रोजी कृषी विकास परिषद व प्रदर्शनीचे उदघाटन प्रसंगी कृषी मंत्री श्री.ॲड. कोकाटे यांनी केली

शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना, तसेच शेतकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या सूचनांसाठी जिल्हास्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षाला प्राप्त सूचना 24 तासाच्या आत मंत्रालयात कळविण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकोटे यांनी दिली.

तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी विभागीय स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीचे अध्यक्ष कृषी मंत्री राहतील. समितीची तीन महिन्यातून एकदा बैठक घेण्यात येईल. यावेळी शिवारफेरीही काढण्यात येईल. अशा बैठकीतून जिल्ह्याचा डाटा तयार होणार असून राज्याचे धोरण ठरविण्यास उपयुक्त ठरणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण आणि इतर निविष्ठांसाठी सध्या असणारी लॉटरी पद्धत बंद करण्यात येईल. यात सुटसूटीतपणा यावा, यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यास 15 दिवसांचा कालावधी दिला जाईल.

शेतीची उत्पादक वाढविण्यासाठी नवीन मंच तयार करण्यात येईल. यातून तज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांकडून शेतीबाबत मार्गदर्शन आणि सल्ला दिला जाईल. त्याबरोबरच कृषी विद्यापीठांनी संशोधनाला गती देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रयोग यशस्वी करावेत, तसेच अद्यावत लॅब उभारावी अशी आशा वेक्त केली.

किटकनाशकांचे दर ठरविण्यावर केंद्र आणि राज्य सरकारचे नियंत्रण नाही. याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. याबाबतीत केंद्र शासनाकडेप्रस्ताव पाठविण्यात येईल. ठिंबक सिंचनाचे राज्याचे अनुदान येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबत आधीच राज्यस्तरावर चर्चा करण्यात आली आहे.

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाची मदत घेण्यात येणार आहे. शेतीला कुंपन घालण्यापेक्षा शेतकऱ्यांना उत्पादन देईल अशी कुंपन व्यवस्था करण्यात येईल. बांधावर बांबू, काटेसावर, करवंदाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. यामुळे कुंपनाच्या व्यवस्थेसाबतच पुरक उत्पन्नाची सोय होणार असल्याचे कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.
०००००००
